ब्युरो टीम : भावंडांमधील जिव्हाळा, निरागस विनोद आणि पोट धरून हसवणारे प्रसंग यामुळे 'साडे माडे तीन’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला आहे. आता तब्बल एकोणीस वर्षांनंतर, त्याच आठवणींना उजाळा देत ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अंकुश चौधरी हा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर झळकलं असून हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केलं असून हा सिनेमा येत्या ३० जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा