Sunburn Festival :सनबर्न फेस्टिवल' विरोधात वाशी, वसई आणि विरार येथे आंदोलने !


ब्युरो टीम : नेहमीच वादग्रस्त राहिलेला 'सनबर्न फेस्टिवल’ गोव्यासह विविध ठिकाणी हद्दपार झाल्यानंतर यावर्षी मुंबईत शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अंमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या 'सनबर्न फेस्टिवल'ला मुंबईसह आता नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातूनही विरोध होत आहे. वाशी, वसई आणि विरार येथे सनबर्न फेस्टिवल' तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. यावेळी आंदोलनात युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी सहभाग घेतला.

'सनबर्न हटवा - देश वाचवा', 'भारत माता की जय', 'वंदे मातरम', छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा यावेळी आंदोलनात देण्यात दिल्या. आंदोलकांनी 'सनबर्न'ला विरोध करणारे फलक हातात धरले होते. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शवीला.

आधीच ड्रग्सच्या तस्करीसाठी संवेदनशील ठरलेल्या मुंबईमध्ये युवकांचा जीव आणि आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता या महोत्सवामुळे निर्माण झाली आहे. शासनाचा कर बुडवणाऱ्या आणि तरुण पिढीला नशा करायला उद्युक्त करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रशासनाने अनुमती का दिली ? हा प्रश्न या आंदोलनात उपस्थित करण्यात आला असून ‘सनबर्न  फेस्टिव्हल’ छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीतून, तसेच देशातूनच कायमचा हद्दपार करावा, अशी मागणी 'नशा विरोधी संघर्ष अभियाना’ने केली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने