ब्युरो टीम:- सोलापूर शहरातील दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा व निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये, 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील, तसेच अनुक्रमे 14,15 व 16 जानेवारी रोजी निवडणूकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश दिले आहेत.
कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी :-
- दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सिध्देश्वर यात्रे निमित्त सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद
- दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस बंद
- दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस बंद
- दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस बंद
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
.jpeg)
टिप्पणी पोस्ट करा